Refund examination fees of 10th standard students, letter from Chhatra Bharati to the Minister of Education
दहावीच्या सर्व विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क परत करा, छात्रभारती चे शिक्षण मंत्र्यांना पत्र.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यात दहावीच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय राज्य सरकारने नुकताच घेतला आहे. विद्यार्थ्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने राज्य सरकारने हे पाऊल उचललं आहे असं पाहावयास मिळत आहे.
दहावीच्या परीक्षा रद्द केल्या आहेत तर सर्व विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क परत करा अशी मागणी छात्रभारती ने त्या ठिकाणी केलेली आहे. छात्रभारती ने याबाबत शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांना स्वतः पत्र लिहिलेले आहे.
छात्रभारती ने शिक्षण मंत्र्यांना लिहिलेल्या पत्रात म्हटले की कोरानाचा वाढता प्रादुर्भाव पाहता एसएससी बोर्डाच्या इयत्ता दहावीच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय शासनाने नुकताच घेतलेला आहे .
दहावीच्या बोर्ड परीक्षेत या वर्षी 16 लाखाहून अधिक विद्यार्थ्यांनी दहावीच्या परीक्षेसाठी परीक्षा शुल्क भरून प्रवेश निश्चित केलेला होता. कोरोनाची स्थिती व त्यामुळे सर्वसामान्यांवर आलेली आर्थिक अडचण शासन जाणून घेणार का? तरी कृपा करून दहावीच्या परीक्षा रद्द केल्या आहेत तर परीक्षा शुल्क ही विद्यार्थ्यांना परत करावे.
अकरावीच्या प्रवेशासाठी विद्यार्थ्यांचे मूल्यांकन कसं करणार हा मोठा प्रश्न सरकारसमोर उपस्थित झाला आहे
दहावीच्या परीक्षेसाठी सिबीएससी बोर्ड आणि आय सी एस ई बोर्डात सेमिस्टर पद्धत असते तसेच या व्यतिरिक्त अंतर्गत मूल्यांकन नाही होत असते . या आधारावर विद्यार्थ्यांना दहावीचा निकाल दिला जाऊ शकतो परंतु महाराष्ट्र बोर्डाच्या दहावीच्या विद्यार्थ्यांची केवळ बोर्डाची परीक्षा पार पडत असते हे नेहमी लक्षात ठेवावे लागते. तसेच अंतर्गत मूल्यांकन ही फक्त 20 मार्कांचे असते. त्यामुळे परीक्षा रद्द केल्यानंतर ही विद्यार्थ्यांना कशाच्या आधारावर गुण द्यायचे हा प्रश्न कायम उपस्थित राहतो ..
टिप्पणी पोस्ट करा
0 टिप्पण्या