Socialize

Type Here to Get Search Results !

Maharashtra Lockdown Extended | राज्यातील लॉकडाऊन 15 मे पर्यंत वाढला, मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय

State lockdown Increase until May 15, Cabinet meeting decides



राज्यात 30 एप्रिल पर्यंत लागू असलेला लॉकडाउन पुढेही कायम राहणार आहे आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय एक मे नंतर पुढील पंधरा दिवस लॅाकडाऊन कायम राहणार असल्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला आहे


15 मे पर्यंत राज्यात लॅाकडाऊन कायम ठेवण्याची मागणी अनेक मंत्र्यांनी मंत्रिमंडळ बैठकीत आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली 15 मेपर्यंत लॅाकडाऊन कायम ठेवला तर आपल्या राज्याला फायदा होऊ शकतो असा तज्ञांनी सल्ला दिला आहे कोरोना ची साखळी जर तोडायची असेल तर लॅाकडाऊन कायम ठेवणे गरजेचे आहे मंत्र्यांनी पंधरा दिवस पुढील लॅाकडाऊन वाढीचा आग्रह धरला आहे त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे लवकरच याबाबतची घोषणा करण्याची शक्यता आहे


सध्या राज्यात लॅाकडाऊन चा सकारात्मक परिणाम दिसत आहे गेल्या दोन-तीन दिवसांपासून राज्यातील रुग्ण संख्या कमी होते आहे नागरिकांनी मास घालणे सोशल डिस्टंसिंग चे पालन करणे त्याचबरोबर ही त्रिसूत्री कोरणा प्रतिबंधात्मक नियमांचं पालन केलं पाहिजे त्यामुळे पंधरा दिवसांचा लॉकडाउन वाढल्याने परिस्थिती नियंत्रणात येण्यास मदत होईल असं आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी सांगितलं आहे


आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय राज्यात सरसकट सर्वांच मोफत लसीकरण होणार


राज्यातील 18 ते 44 या वयोगटातील सर्वांना कोवीड प्रतिबंधात्मक लस मोफत देण्याचा निर्णय आज झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला बैठकीनंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज याची ही घोषणा केली लसीकरण कार्यक्रमाबाबत आरोग्य विभाग नियोजन करीत असून नागरिकांना याबाबत व्यवस्थित पूर्वसूचना देण्यात येतील त्यामुळे लसीकरण केंद्रावर अनावश्यक गर्दी करू नये असेही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं आहे


लसीच्या पुरवठा प्रमाणे लसीकरण कार्यक्रम घोषित करणार


सध्या महाराष्ट्र राज्या समोर आर्थिक अडचण असूनही नागरिकांच्या आरोग्याला सर्वोच्च प्राधान्य देण्यात आले आहे त्यामुळेच 18 ते 44 या वयोगटातील सर्वांना सरसकट मोफत लस देण्याचा निर्णय आज झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला असून लसींचा पुरवठा कसा होतो यानुसार लसीकरण नियोजन करून पुढील कार्यक्रम जाहीर करण्यात येईल असेही मुख्यमंत्र्यांनी आज सांगितले


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Area