If you want to take the matriculation exam, vaccinate the students one hundred percent, give them insurance cover ...
covid-19 संकटाच्या काळात परीक्षा देण्याबाबत विद्यार्थी, पालक, शिक्षक सर्वच अस्वस्थ आहेत. याचा विचार करून बारावीची परीक्षा रद्द करण्यात यावी.या परीक्षा घ्यायचे असतील तर बारावीच्या विद्यार्थ्यांना शंभर टक्के लसीकरण करावे, त्यांना विमा कवच द्यावे, अशी मागणी नाशिक जिल्हा मुख्याध्यापक संघाच्या वतीने करण्यात आलेली आहे.
महाराष्ट्र राज्यात कोरोना चा संसर्ग वेगाने वाढत आहे कोरोनाग्रस्त रुग्णांमध्ये युवा वर्गाचे प्रमाण जास्त प्रमाणात आहे अशा धोकादायक वातावरणात परीक्षा घेणे कितपत योग्य आहे याविषयी धास्तावलेले पालक मुख्याध्यापकांना दूरध्वनीवरून सातत्याने विचारणा करत आहेत.
समाज माध्यमातून आपली नाराजी व्यक्त करत आहेत.
परीक्षा घ्यायच्या असतील तर बारावी च्या विद्यार्थ्यांना 100% लसीकरण करून द्यावे त्यांना विमा कवच द्यावे सर्व वैद्यकीय सुविधा पुरवाव्यात सोबत परीक्षा संचालनालयात काम करणाऱ्या यंत्रणेचे लसीकरण करून विमा कवच द्यावे अशी मागणी नाशिक जिल्हा मुख्याध्यापक संघाच्या वतीने करण्यात आली आहे याबाबत शिक्षण मंत्र्यांना निवेदन सुद्धा देण्यात आलेले आहे.
कोरोनाची संकट मोठ्या प्रमाणात वाढत असताना विद्यार्थी या आजाराने बाधित होण्याचे प्रमाणही खूप वाढलेले आहेत अशा परिस्थितीत बारावीची परीक्षा घेणे योग्य ठरणार नाही असेही निवेदनामध्ये स्पष्टपणे म्हटलेले आहे.
टिप्पणी पोस्ट करा
0 टिप्पण्या