दहावीच्या परीक्षांसाठी महाराष्ट्राचा स्वतंत्र पॅटर्न
- डॉ. अ. ल. देशमुख
सीबीएससी पाठोपाठ महाराष्ट्र शासनाने देखील दहावीची बोर्डाची परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतलेला आहे कोरोना च्या पार्श्वभूमीवर स्वयंअध्ययन तंत्राच्या शिक्षणात किती उपयोग होतो हे आपल्याला बोर्डाच्या परीक्षेचा निकालावरण समजले असते पण ती संधी आपण गमावली आहे दहावीच्या परीक्षांसाठी महाराष्ट्राचा स्वतंत्र पॅटर्न तयार करून तो संपूर्ण देशालाच नव्हे तर जगायला दाखवायला हवा
या निर्णयानंतर वृत्तपत्रांमधून आलेल्या प्रतिक्रियांचे विश्लेषण केल्यास असे दिसून येते की सीबीएससी व स्टेट बोर्डाच्या 90 ते 95 टक्के शिक्षक विद्यार्थी आणि पालक यांनी याविषयी नकारात्मक विचार व्यक्त केले आहेत संपूर्ण देशभरात आज शहरी भागात डिजिटायझेशन प्रसार पुरेसा झालेला आहे सर्व साधारणपणे सीबीएससी च्या शाळांमध्ये जाणाऱ्या विद्यार्थ्यांचे पालक सदन आहेत
त्यांनी डिजिटलायझेशन साठी आवश्यक असणारी साधन सामग्री पाल्यांना म्हणजेच आपल्या मुलांना उपलब्ध करूनही दिली आहे त्यामुळे मुलांना दहावीच्या अभ्यासक्रमाचे मार्गदर्शन शिक्षकांनी व्यवस्थित केले होते अनेक शाळांमधील शिक्षकांनी विद्यार्थ्यांचा सराव परीक्षा आणि टेस्ट सिरीज घेऊनही विद्यार्थ्यांची तयारी केलेली होती त्यामुळे विद्यार्थी या परीक्षेला निश्चितपणे यशस्वीरीत्या सामोरे जाऊ शकले असते कोरोना च्या पार्श्वभूमीवर स्वयंअध्ययन तंत्राचा शिक्षणात किती उपयोग होतो हे आपल्याला बोर्डाच्या परीक्षेच्या निकालावरून समजले असते हा एक संशोधनाचाच प्रकल्प झाला असता असा सकारात्मक विचार शिक्षणामध्ये करण्याची गरज आहे सीबीएसई बोर्डाने ही तो करायला हवा होता
सी बी एस सी बोर्डाची परीक्षा रद्द झाल्यामुळे महाराष्ट्र राज्यातील काही नकारात्मक प्रवृत्तींनी लगेच उभारी घेऊन राज्य शिक्षण मंडळाची म्हणजेच SSC ची परीक्षाही रद्द करावी अशी मागणी केली होती आपण मागणी काय करतो आहोत याचा सारासार विचार करण्याची कुवत या दहा टक्के लोकांमध्ये नाही असे खेदाने म्हणावेसे वाटते पण राज्य शिक्षण मंडळाने परीक्षा पुढे रद्द केल्या आहेत कोरोना चा संपूर्ण महाराष्ट्र मध्ये विळखा आहे खऱ्या अर्थाने शाळा दहा-पंधरा दिवस चाललेल्या आहेत
त्यामुळे विद्यार्थ्यांचे अंतर्गत मूल्यमापन नाही प्रभावीरीत्या आणि परिणामकारक पद्धतीने झालेले नाही ही वस्तुस्थिती आहे यात कोणाचाही दोष नाही परिस्थितीच अत्यंत कठीण असल्याने आपल्याला आता बहिस्त मूल्यमापन म्हणजेच बोर्डाची लेखी परीक्षा हा एकमेव शिल्लक उपाय आहे म्हणूनच ही परीक्षा उशिरा का होईना पण राज्य बोर्डाने ती ऑफलाइन पद्धतीने घेणे आवश्यक होते
ऑफलाइन परीक्षा घ्यायची असेल तर आपल्याला पुरेशी तयारी करण्यासाठी जेवढे दिवस लागतील तेवढे दिवस घ्यायला हवे होते अर्थातच या दिवसांमध्ये शासनाने पूर्वतयारी जतन करणे आवश्यक आहे त्यादृष्टीने कुठलेही पाऊल उचललेले दिसत नाहीत समाजातील सर्व घटकांना म्हणजेच डॉक्टर्स इंजिनीयर्स व्यापारी शेतकरी त्याच बरोबर समाजसेवक पालक महाविद्यालयीन कर्मचारी विद्यापीठातील शिक्षण तज्ञ संस्थाचालक आदींचा वेगवेगळ्या पातळीवर बैठका घेऊन प्रत्येकाकडे ही परीक्षा ऑफलाइन यशस्वीरीत्या घेण्यासाठी काहीतरी जबाबदारी टाकायला हवी होती आणि हे आव्हान पेलुन दाखवावे
यातच आपले मोठेपण आहे वास्तविक दहावीच्या परीक्षांसाठी महाराष्ट्र राज्याचा आपण स्वतंत्र पेटंट तयार करावा आणि तो संपूर्ण देशालाच नव्हे तर जगाला दाखवावा ही संधी आपल्याला चालून आली होती पण ती आपण गमावलेली आहे
टिप्पणी पोस्ट करा
0 टिप्पण्या