In the state of Maharashtra, there was no time to announce the schedule of Class XII examination
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने घेण्यात येणार्या इयत्ता बारावीच्या परीक्षा बाबत ही अनिश्चितता निर्माण झालेली पाहायला मिळत आहे. परीक्षेचे नवीन वेळापत्रक जाहीर करण्यास मुहूर्तच सापडत नसल्याने विद्यार्थी, पालक, शिक्षक संभ्रमात पडलेले आहेत.
दरवर्षी महाराष्ट्र राज्यामध्ये बारावीची परीक्षा फेब्रुवारी-मार्च मध्ये घेण्यात येत असते. यंदा महाराष्ट्र राज्यामध्ये कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे परीक्षा एप्रिल-मे मध्ये घेण्याचे नियोजन करण्यात आले होते. 23 एप्रिल ते 21 मे या कालावधीत या परीक्षा घेण्याचे वेळापत्रक ही जाहीर करण्यात आले होते. पण त्यानंतर पुन्हा हे वेळापत्रक रद्द करण्यात आले. आता मे महिन्याच्या अखेरीस या परीक्षा होतील अशी घोषणा शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी केली होती.
वर्षभर शाळा कनिष्ठ महाविद्यालये बंद ठेवण्यात आली होती ऑनलाईन शिक्षण सुरू ठेवण्याला प्राधान्य देण्यात आलेले होते. दहावी व बारावी हे दोन्ही वर्ष व त्यांच्या परीक्षा या विद्यार्थ्यांच्या आगामी करिअरच्या दृष्टीने खूप महत्त्वाच्या असतात. महाराष्ट्र राज्य मध्ये परीक्षा होणार होणार असे म्हणत दहावीच्या परीक्षा रद्द करण्यात आल्या आहेत. बारावीच्या परीक्षाचे तसेच होणार का असा प्रश्न उपस्थित करण्यात येऊ लागला आहे.
बारावीच्या परीक्षेसाठी 14 लाख विद्यार्थ्यांची नोंदणी झालेली आहे हे तुम्हा सर्वांना माहितीच असेल. कोरोनाच्या संकटामुळे जेईई, नीट यासारख्या प्रवेश परीक्षा लांबणीवर पडल्या आहेत. बहुतेक अभ्यासक्रमाच्या प्रवेश परीक्षा प्रक्रियेत बारावीचे गुण व प्रवेश परीक्षेचे गुण दोन्ही महत्त्वाचे असतात त्यामुळे बारावीच्या परीक्षा या कोणत्याही परिस्थितीत झाल्याच पाहिजेत असा आग्रह धरण्यात आलेला आहे.
टिप्पणी पोस्ट करा
0 टिप्पण्या