CBSC board announces 10th grading criteria
सीबीएससी बोर्डाने दहावीच्या गुणांकन यांचे निकष जाहीर केले आहेत त्यानुसार अंतर्गत मूल्यमापन करून निकाल लावण्यात येणार असल्याची माहिती मिळालेली आहे मे महिन्यात मूल्यांकन पूर्ण झाल्यानंतर 20 जून पर्यंत निकाल जाहीर होण्याची दाट शक्यता आहे कोरोना वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने म्हणजेच सीबीएससी येणे इयत्ता दहावीची परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला होता प्रचलित धोरणानुसार सीबीएसईच्या विद्यार्थ्यांचे मूल्यमापन परीक्षा 80 गुणांची लेखी परीक्षा आणि 20 गुणांची अंतर्गत मूल्यमापन ह्या आधारे होत असते.
यंदाही विद्यार्थ्यांचे मूल्यांकन शंभर गुणांच्या आधारे होणार आहे विद्यार्थ्यांचे 20 गुणांचे मूल्यांकन प्रचलित नियमानुसार आतापर्यंत घेतलेल्या विविध परीक्षांच्या आधारित याचे गुणांकन करावे असे मंडळाच्या परीक्षा नियंत्रक संयम भारद्वाज यांनी जाहीर केले आहे यासाठी मंडळाने वेगवेगळे निकष जाहीर केले आहेत मंडळाने परीक्षा रद्द केल्याने 80 गुणांचे मूल्यांकन शाळांनी चेक करायचे आहे हे मूल्यांकन शाळांनी वर्षभरात घेतलेल्या विविध परीक्षांच्या माध्यमातून करायचे आहे असेही या पत्रकात सांगण्यात आलेले आहे हे सर्व मूल्यांकन पूर्ण करून सर्व माहिती 11 जून पर्यंत मंडळाला सादर करण्यात यावी असे नोटिफिकेशन मध्ये म्हटलेले आहे.
मूल्यांकन करण्यासाठी शाळेत मूल्यांकन समिती स्थापन करण्यात येणार असून यात मुख्याध्यापक एक आणि सात शिक्षकांचा समावेश असणार आहे हे शिक्षक गणित समाजशास्त्र विज्ञान आणि दोन भाषा विषयांच्या असतील दोन शिक्षक हे बाहेरील शाळेचे असणार आहेत बाहेरील शाळातील शिक्षकांना पंचवीस शे रुपये मानधन देण्यात येणार आहे तर शाळेतील शिक्षकांना या कामासाठी पंधराशे रुपये मानधन देण्यात येणार आहे.
एक जूनला बारावीचा निकाल
बारावीच्या परीक्षेचा निर्णय एक जूनला घेण्यात येणार आहे सध्या विद्यार्थ्यांसाठी प्रश्न संच उपलब्ध करून देण्यात आला असून तो विद्यार्थ्यांनी सीबीएससी च्या ऑफिशिअल वेबसाईट वरून डाऊनलोड करता येणार आहे.
अशी असणार गुणदान पद्धत :-
1) चाचणी परीक्षा - 10 गुण
2) सहामाही परीक्षा - 30 गुण
3) सराव परीक्षा - 40 गुण
टिप्पणी पोस्ट करा
0 टिप्पण्या