राज्यातील सरळ सेवा भरती प्रक्रियेवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे | काळा यादीत असलेल्या कंपनी कडून MIDC ची परीक्षा ?
महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ यांनी 2019 साली 865 जागांसाठी विवीध पदांची भरती प्रक्रिया जाहीर केली होती आणि 2019 ब तेच महापरीक्षा पोर्टल तर्फे जाहिरात देण्यात आली होती त्यावेळी विद्यार्थ्यांनी अर्ज देखील केलेले होते परंतु 2020 मध्ये महापरीक्षा पोर्टल बंद झाल्यानंतर कुठल्याही प्रकारच्या या कंपनीची निवड केलेली नव्हती आणि कंपनी निवडीसाठी टेंडर मागवलेले होते कंपनी निवडीसाठी जवळजवळ सात ते आठ महिन्यांचा काळ उलटला आणि त्यादरम्यानच कोणाचे सुद्धा संकट महाराष्ट्राच्या नव्हे तर संपूर्ण जगावर आले आणि त्यामुळे कंपनी निवड अधिकच उशिराने त्याठिकाणी झाली परंतु उशिरा का होईना कंपनीची निवड झाली आणि एकूण पाच कंपन्या सरळ सेवा भरती प्रक्रिया राबवण्यासाठी निवडण्यात आल्या त्या पाच कंपन्यांची नावे पुढीलप्रमाणे आहेत
- मेसर्स अँप टेक लिमिटेड
- मेसर्स जीए सॉफ्टवेअर टेक्नॉलॉजी प्रायव्हेट लिमिटेड
- मेसर्स जिंजर वेब प्रायव्हेट लिमिटेड
- मेसर्स मेटा आय टेक्नॉलॉजी प्रायव्हेट लिमिटेड
- मिसर्स न्यास कम्युनिकेशन प्रायव्हेट लिमिटेड
या प्रायव्हेट कंपन्यांची सरळसेवा भरती प्रक्रिया राबविण्यासाठी निवड करण्यात आलेली आहे मात्र 20 ऑगस्ट पासून सुरु असलेली परीक्षा ही दिल्ली आणि अलाहाबाद उच्च न्यायालयाने काळ्या यादीत टाकलेल्या मेसर्स Aptech लिमिटेड कंपनी करून घेतले जात असल्याची बाब उघड झाली आहे राज्यातील विविध विभागांच्या सरळ सेवा भरती अंतर्गत होणाऱ्या सर्व परीक्षा या MahaIt तर्फे निवडण्यात आलेल्या खाजगी कंपन्यांकडून घेतल्या जात आहे
MIDC अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार हि सर्व प्रक्रिया राबविण्यासाठी राज्य सरकारच्या Maha It ने शासन निर्णयानुसार निवड केलेल्या पाच कंपनी पैकी एका कंपनीला एमआयडीसी परीक्षेचे काम द्यायचे होते त्यानुसार आम्ही या कंपनीला हे काम दिले आणि एमआयडीसी भरतीची काही पदांची लेखी परीक्षा ऑनलाइन परीक्षा व्यवस्थित पार पडली आहे
टिप्पणी पोस्ट करा
0 टिप्पण्या