Socialize

Type Here to Get Search Results !

खुशखबर - ७५ हजार पदांची मेगा भरती १५ ऑगस्ट च्या आधी करणार!! | State Mega Bharti 2023 | Maharashtra Mega Bharti 2023

 State Mega Bharti 2023

State Mega Bharti New Upadte Maharashtra

अन्य महत्वाच्या भरती 





खुशखबर - ७५ हजार पदांची मेगा भरती १५ ऑगस्ट च्या आधी करणार!!

महाराष्ट्र राज्यातील 75 हजार पदांची नोकर भरती (Maharashtra Govt Recruitment) प्रक्रिया 15 ऑगस्टपूर्वी पूर्ण करण्यासाठी प्रशासकीय यंत्रणा कामाला लागली आहे. ज्या जिल्ह्यात टीसीएस आणि आयबीपीएस या कंपनींचे परीक्षा केंद्र नाहीत त्याठिकाणी पॉलिटेक्निक किंवा इंजिनिअर कॉलेजची मदत घेतली जाणार आहे. परीक्षा सुरळीत पणे  पार पाडण्यासाठी मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली लवकरच समिती गठीत केली जाणार आहे. त्यामुळे दिलेल्या मुदतीत ही मेगाभरती पूर्ण होते का, याकडे संपूर्ण राज्यभरातील तरुणांचे लक्ष लागून आहे.




देशाच्या स्वतंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त राज्यात 75 हजार पदांची नोकर भरती केली जाणार आहे. मात्र याच नोकर भरतीमध्ये अनेक अडथळे निर्माण होताना पाहायला मिळतात. हे अडथळे दूर करण्यासाठी आणि पारदर्शकपणे नोकर भरती राबविण्यासाठी राज्य सरकार मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत करणार आहे. ऑनलाईन पद्धतीने पहिल्यांदाच एवढी मोठी मेगाभरती होत असल्याने संबंधित कंपन्यांकडे परीक्षा केंद्र कमी पडत असल्याने नोकरभरती कशी राबवायची यावर मंत्रीमंडळ बैठकीत चर्चा झाली आहे. त्यानंतर मुख्य सचिव यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

राज्यात ऑनलाईन परीक्षा घ्यायच्या असेल तर टीसीएस कंपनीची परीक्षा घेण्यासाठी 7500 ते 8000 पर्यंत क्षमता आहे. तर आयबीपीएस कंपनीची परीक्षा घेण्यासाठी 10000 ते 15000 पर्यंत उमेदवारांची एकावेळी परीक्षा घेऊ शकतात. लाखांच्या संख्येने जर उमेदवार आले तर नेमकी परीक्षा प्रक्रिया कशी राबवायची हा सगळ्यात मोठा प्रश्न संबंधित कंपन्या आणि राज्य सरकारच्या पुढे आहे. हा प्रश्न सोडवण्यासाठी राज्य सरकारने मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली ही समिती गठित केली आहे. त्याचबरोबर ज्या ठिकाणी या कंपन्यांची परीक्षा सेंटर नाहीत त्या ठिकाणी खाजगी मदत घेतली जाणार आहे. ज्या ठिकाणी इंजीनियरिंग कॉलेज असेल किंवा ITI असेल किंवा इतर ठिकाणी उपलब्ध असलेले कॉम्प्युटर यांच्या माध्यमातून ही परीक्षा घेण्यात येणार आहे.

राज्यात पहिल्यांदाच सर्वात मोठ्या प्रमाणात 75 हजार जागांसाठी ही नोकर भरती होणार आहे. त्यामुळे मागच्या काही परीक्षांमध्ये झालेला घोटाळा लक्षात घेता ही परीक्षा सुरळीतपणे आणि पारदर्शकपणे पार पाडण्यासाठी संबंधित कंपन्या आणि राज्य सरकार हे अडथळे दूर करुन हे मिशन कसे यशस्वी करणार याकडे सर्वांचं लक्ष लागले आहे.

या भरती प्रक्रियेत परीक्षा घेण्यासाठी ज्या टीसीएस आणि आयबीपीएस संस्थेची निवड करण्यात आली आहे, त्या कंपन्यांच्या कार्यक्षमतेबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात येत आहेत. या संस्थांशी करार करण्यात आला, त्याचवेळी याचा विचार करण्यात आला असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली. मुंबई, पुणे वगळता इतर जिल्ह्यांत ही समस्या उद्भवण्याची शक्यता होती. त्यामुळे तेथे पॉलिटेक्निक कॉलेज आणि इतर कॉलेजांच्या मदतीने व्यवस्था उभी करण्यात येणार आहे. त्यामुळे परीक्षा पद्धतीत कोणत्याही प्रकारचे अडथळे येणार नसल्याचे अधिकाऱ्यानी नमूद केले.

Good news - mega recruitment of 75 thousand posts will be done before August 15


The administrative system has started working to complete the Maharashtra Govt Recruitment process for 75 thousand posts before August 15. In districts where TCS and IBPS companies do not have examination centers, the help of polytechnic or engineering college will be taken. A committee will soon be formed under the chairmanship of the Chief Secretary to conduct the examination smoothly. Therefore, whether this mega recruitment is completed within the given time frame, the attention of the youth across the state is on.

On the occasion of the Amrit Jubilee year of the country's independence, 75 thousand posts are going to be recruited in the state. But many obstacles can be seen in the recruitment of these same employees. The state government will constitute a committee under the chairmanship of the chief secretary to remove these obstacles and conduct recruitment in a transparent manner. As this mega recruitment is being done online for the first time, the concerned companies are running out of exam centers, so how to implement the recruitment has been discussed in the cabinet meeting. After that, it has been decided to form a committee under the chairmanship of the Chief Secretary.

TCS company has a capacity of 7500 to 8000 to take the exam if online exam is to be conducted in the state. Whereas for IBPS company exam 10000 to 15000 candidates can take exam at a time. If lakhs of candidates come, then the biggest question before the concerned companies and the state government is how to conduct the exact examination process. To solve this problem, the state government has formed this committee under the chairmanship of the chief secretary. At the same time, private help will be taken in places where these companies do not have examination centers. The examination will be conducted through the computer available at the place where there is an engineering college or ITI or any other place.

For the first time this job recruitment is going to be done for the largest number of 75 thousand posts in the state. Therefore, in view of the scams that have taken place in the last few examinations, all eyes are on how the concerned companies and the state government will remove these obstacles and make this mission successful in order to conduct this examination smoothly and transparently.

Questions are being raised about the efficiency of the companies that have been selected for the TCS and IBPS exam in this recruitment process. Officials informed that an agreement was signed with these institutions, while this was being considered. This problem was likely to arise in other districts except Mumbai, Pune. Therefore, arrangements will be made there with the help of polytechnic college and other colleges. Therefore, the officer mentioned that there will not be any kind of obstacles in the examination system.


खुशखबर - 15 सप्टेंबर पासून भरती प्रक्रिया सुरू होणार गृह विभागाच्या 7231 पदांचा समावेश


दिवाळीपूर्वी शासकीय मेगा भरती चे नियोजन


विधानमंडळाच्या पावसाळी अधिवेशनानंतर शिंदे फडणवीस सरकारने तब्बल 78 हजार 257 जागांची भरती करण्याचे नियोजन केले आहे त्यासंदर्भात सामान्य प्रशासन विभागाची बैठक झाली विभागातील 7221 जागा यांचाही त्यात समावेश असून ही भरती प्रक्रिया साधारणतः सप्टेंबर पासून सुरू होणार असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिलेली आहे


राज्य सरकारच्या सव्वादोन लाख जागा रिक्त आहेत महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या माध्यमातून शंभर टक्के जागांची पुढील दोन महिन्यात भरती होणार आहे त्या अनुषंगाने संबंधित विभागांनी पंधरा दिवसात आयोगाकडे मागणी पत्र पाठवावेत असे निर्देश सामान्य प्रशासन विभागाने दिले आहेत


त्यातून जवळपास 11026 जागांची भरती होईल दुसरीकडे शासनाच्या महत्वाच्या विभागांमधील रिक्त जागांची संख्या वाढल्याने पोलीस प्रशासनावरील ताण वाढला आहे ा पार्श्‍वभूमीवर पुढील दीड ते दोन महिन्यात सरकार कडून 67 हजार 231 जागांची होईल असेही सूत्रांनी सांगितले आहे विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात मंत्री शंभूराज देसाई यांनी राज्याच्या शासकीय विभागांमधील रिक्त जागांची माहिती देत असतानाच स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाचे औचित्य साधून राज्य सरकार 75 हजार जागांची भरती करेल असे स्पष्ट केले होते त्याच वेळी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही पोलिसांच्या 7231 जागांची लवकरच होईल अशी ग्वाही दिली होती दिवाळीनंतर 25 ते 50 हजार जागा भरतीचा दुसरा टप्पा जाहीर होऊ शकतो असेही सूत्रांनी सांगितले आहे 


Good News - Process starting from 15th September including 7231 posts of Home Department


Government mega recruitment planning before Diwali


After the monsoon session of the Legislature, the Shinde Fadnavis government has planned to recruit as many as 78 thousand 257 seats. In this regard, a meeting of the General Administration Department was held, including 7231 seats in the department.


The General Administration Department has directed that the concerned departments should send a demand letter to the commission within fifteen days as the recruitment of one hundred percent of the vacancies will be done in the next two months through the Maharashtra Public Service Commission.


About 11026 seats will be recruited from it. On the other hand, due to the increase in the number of vacancies in the important departments of the government, the pressure on the police administration has increased, sources have also said that 67 thousand 231 seats will be filled by the government in the next one and a half to two months. At the same time, Home Minister Devendra Fadnavis also assured that the 7231 police posts will be filled soon. Sources also said that the second phase of recruitment of 25 to 50 thousand posts may be announced after Diwali.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Area